विजयादशमीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

0 3


मुंबई, दि. १९  : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विजयादशमी (दसरा) सणानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी हा सण सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवर, सत्याचा असत्यावर आणि  ज्ञानाचा अज्ञानावर विजयाचे प्रतीक आहे. हा सण नैतिक मूल्यांचे पालन करण्याची आणि शांततापूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो.

विजयादशमीचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

0000

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.