‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धे’बाबत पुण्यात २२ ऑक्टोबरला जनजागृती सत्र

0 0


‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धे’बाबत पुण्यात २२ ऑक्टोबरला जनजागृती सत्र

मुंबई, दि. १९ : सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’च्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत पुणे येथे २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विशेष सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हा उपक्रम राबवत आहे. पुण्यातील सत्राच्या स्थानिक आयोजन व समन्वयासाठी ‘COEP भाऊ इन्स्टिट्यूट’चे सहकार्य घेण्यात येत आहे. सत्रात उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी आणि संबंधित प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित भागधारकांशी संवाद साधतील.

जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवून सत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे. सत्राचे निश्चित स्थळ आणि अन्य आवश्यक सूचना स्थानिक असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त आवाहन सु.रा.वराडे यांच्याकडून कळविण्यात येतील.

०००००

संध्या गरवारे/विसंअ

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.