‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा’ जनजागृती सत्राचे २१ ऑक्टोबरला आयोजन

0 0


‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा’ जनजागृती सत्राचे २१ ऑक्टोबरला आयोजन

मुंबई, दि. १९ : सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’विषयी जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने छत्रपती संभाजीनगर येथे २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत विशेष सत्र आयोजित केले आहे.

राज्यातील विद्यार्थी, युवक, नवसंशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योजकांना नाविन्यपूर्ण कल्पना व उपाययोजना मांडण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग हा उपक्रम राबवत आहे. जनजागृती सत्रात उपक्रमाची उद्दिष्टे, सहभागाच्या संधी आणि संबंधित प्रक्रियेची माहिती दिली जाईल. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित भागधारकांशी संवाद साधतील. स्थानिक आयोजन व समन्वयासाठी ‘मॅजिक’ संस्थेचे सहकार्य घेण्यात येत आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इनक्युबेशन केंद्रे, स्टार्टअप्स, नवसंशोधक, उद्योजक आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाची माहिती इच्छुकांपर्यंत पोहोचवून सत्रात सहभागी व्हावे. सत्राचे निश्चित स्थळ व अन्य आवश्यक सूचना जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त आवाहन रा.नि.वाकोडे यांनी केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

 

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.